Beed  विनोद जिरे
महाराष्ट्र

ट्रॅक्टरखाली चिरडून ५ वर्षीय बालकाचा मृत्यू, माजलगाव येथील धक्कादायक घटना

ट्रॅक्टरखाली चिरडून ५ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली

विनोद जिरे

बीड: धारूर बस डेपोच्या समोर आज सकाळी केजवरून माजलगावला (Majalgaon) जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून ५ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अरुंद रस्ता असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अरुंद रस्त्यामुळे (road) आणखी कित्येक निष्पाप नागरिकांचे बळी जाणार आहेत? असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हे देखील पहा-

धारूर येथील बस डेपोच्या (Bus Depot) समोर केजवरून माजलगावकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून शिवराज सुरवसे या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरवसे यांचा बस डेपोच्या बाजूला जनावरांचा गोठा आहे. त्या जागेमध्ये त्यांची जनावरे बांधली जातात. सकाळी शिवराज आणि त्याची आजी दूध आणण्यासाठी गेले होते. सकाळी ९ वाजेच्या सुमारास घराकडे परतत असताना केजवरून माजलगावला जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून शिवराजचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ट्रॅक्टर उचलून बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंबेडकर चौकातून घाटपाटीकडे अतिशय अरुंद रस्ता आहे. यामुळे याठिकाणी नेहमीच अपघात होतात. यात बऱ्याच निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. आणखी किती बळी घेतल्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT