Beed News Saam TV
महाराष्ट्र

Beed News: ग्रामपंचायत निवडणुकीचा थरार; सत्तेसाठी चक्क मामावर तलवारीने केला हल्ला

शाब्दिक बाचाबाचीतून हाणामारी जुंपली भाचा धोंडीराम जाधवने मामावर तलवारीने वार केला.

साम टिव्ही ब्युरो

Beed News: बीडच्या दगडी शहाजानपूर गावात ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा सुरु आहे. कालच प्रचाराचा शेवटचा दिवस होता. काल सायंकाळच्या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाच्याने मामावर चक्क तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात उघडकीस आलाय. पहिला वार केल्यानंतर दुसरा वार करण्याअगोदरच पोलिसांनी भाच्याला पकडले. त्यामूळे मोठी दुर्घटना टळली. (latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, शिवाजीराव चव्हाण असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत मतदानाच्या पूर्वसंध्येलाच तलवारबाजी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मामा चव्हाण आणि भाचा जाधव या दोघांची भेट बीड येथील राजीव गांधी उद्यानासमोर झाली. शाब्दिक बाचाबाचीतून हाणामारी जुंपली भाचा धोंडीराम जाधवने मामावर तलवारीने वार केला तेवढ्यात जवळच चौकात उभे असलेल्या दोन पोलीस हवालदार तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यानी तलवार जप्त केल्याने अनर्थ टळला. सध्या जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

निवडणूकीचा अर्ज भरण्याआधी अपहरण

सांगली ग्रामपंचायत निवडणूकीत देखील असाच धक्कादयक प्रकार पाहायला मिळाला होता. गावात ६ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे एका उमेदवाराने दुसऱ्या इच्छुक उमेदवाराचे अपहरण केले. तसेच शेवटची दिनांक उलटून गेल्यावर त्याला सोडण्यात आले. सदर घटनेत अपहरण झालेल्या व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सर्वच गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात सत्ता मिळवण्यासाठी उमेदवार कायद्याची भीती नसल्याप्रमाणे मर्यादा ओलांडत आहेत. बीड (Beed) आणि सांगली (Sangali) या दोन्ही ठिकाणी घडलेल्या घटनांनी गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT