मावळमध्ये आमदारांच्या मध्यस्थीने शालेय फी सवलतीचा प्रश्न सुटला दिलीप कांबळे
महाराष्ट्र

मावळमध्ये आमदारांच्या मध्यस्थीने सुटला शालेय फी सवलतीचा प्रश्न

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना फीमध्ये तीस  टक्के सवलत देण्याबाबत तहसीलदारांनी आयोजित केलेल्या बैठकीत सहमती झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिलीप कांबळे

मावळ: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना फीमध्ये तीस टक्के सवलत देण्याबाबत तहसीलदारांनी आयोजित केलेल्या बैठकीत सहमती झाली. तीस टक्के फी कमी करण्याचा निर्णय झाला. तर आमदार सुनिल शेळके यांनी पाच टक्के फीचा बोजा उचलण्याची घोषणा केल्याने या विद्यार्थ्यांना एकूण पस्तीस टक्के फी सवलत मिळणार आहे. या निर्णयामुळे मावळातील सुमारे चौदा हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार सुनिल शेळके,आणि माजी राज्यमंत्री  बाळा भेगडे उपस्थित होते. या बैठकीला पालक आणि संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासनाच्या आदेशानुसार ट्यूशन फी व्यतिरिक्त कोणतेही शुल्क शाळांना आकारता येणार नाही. तसेच नवीन फीवाढ करता येणार नाही, असे यावेळी तहसीलदार बर्गे यांनी प्रारंभीच स्पष्ट केले.

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद असून काही संस्थानी ऑनलाईन शिक्षण चालू ठेवलेले आहे.या पार्श्वभूमीवर काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फी भरण्याचा तगादा लावलेला असून फी मध्ये सवलत द्यावी. अशी मागणी पालकांकडून होत आहे. तर काही ठिकाणी पालक व संस्थाचालक यांच्या मध्ये संघर्ष निर्माण झालेला होता.पालकांकडून चालू शैक्षणिक वर्षात फी मध्ये पन्नास टक्के सवलतीची जोरदार मागणी करण्यात आली होती.

दरम्यान गेली दोन महिने आजी माजी आमदार यांनी एक मेकावर जोरदार चिखलफेक केली होती.मावळ मधील सचिन वाजे कोन, तर स्मशानभूमीत कामगार प्रत्येक बॉडी मागे पाच हजार रुपये घेतात. असे अनेक प्रश्न एकमेकांना विचारले त्यानंतर आज दोन्ही आजी माजी आमदार एकत्र आल्याने नागरिक नागरिकांमध्ये कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मावळमध्ये कोणत्याही सकारात्मक गोष्टीसाठी आम्ही कधीही एकत्रित येऊन असं मत माजी मंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आलेल्या महिला भाविकांना भाऊबीजच्या निमित्ताने 10 रुपयांची नोट भेट

Kuchipudi Dance History: 'या' गावाच्या नावावरून कुचीपुडी नृत्याचे नाव पडले, जाणून घ्या त्याचा इतिहास

Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, भाऊबीज साजरी करण्यासाठी जयजयवंती यांच्या घरी पोहचले; पाहा VIDEO

Parineeti Chopra Birthday: राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा कोण जास्त श्रीमंत? जाणून घ्या अभिनेत्रीची नेटवर्थ

EPFO 5 Rule News : आता पेन्शन प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, EPFO चे हे ५ नवे नियम माहिती आहेत का ?

SCROLL FOR NEXT