Latur News Saam TV
महाराष्ट्र

Latur News: कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; गरजेपेक्षा दुप्पट ऑक्सिजनची व्यवस्था

लातूर जिल्ह्यातील मोठ्या तीन रुग्णलयांत एकूण १२ ऑक्सिजन प्लॉट उभारणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Latur News: लातूर जिल्ह्यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर आणि कोविड केअर सेंटर या तिन्ही प्रकारच्या रुग्णलयांच्या ठिकाणी एकूण १२ ऑक्सिजन प्लॉट उभारणी तसेच लिक्वीड ऑक्सिन टॅंक बसविण्यात आले आहेत. या सर्व यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात २५४ मे. टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. गरजेपेक्षा दुप्पट ऑक्सिजनची निर्मिती होत असल्यामुळे लातूर जिल्हा ऑक्सिनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. (Latest Latur News)

लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात १० केएल १० केएल आणि ६ केएल असे तीन लिक्विड ऑक्सिजन प्लॉट, २०० एलपीएमचा हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार प्लॉट, लेबर कॉलनीतील स्त्री रुग्णालयाच्या परिसरात २०० एलपीएमचा प्लॉट असे पाच प्लॉट उभे करण्यात आलेत.

याशिवाय मुरुड येथे १०० एलपीएम, अहमदपूर येथे ५०० एलपीएम, अहमदपूर येथे ३०० एलपीएम, निलंगा येथे ६०० एलपीएम, उदगीर येथे ६०० एलपीएम, १४ केएल आणि निलंगा येथे २० केएल असे एकूण ७ प्लॉट उभारण्यात आले.

जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे शासनाचे एकूण १२ प्लॉटसह मांजरा परिवार, नॅचरल शुगर, नाना गॅस, विजया गॅस, शहरातील डॉक्टरांनी (Doctor) उभा केलेला स्पंदन, मोरगे यांचा ऑक्सिजन प्लॉट असे ऑक्सिजन निर्मितीचे मोठे प्लॉट उभे राहिल्याने लातूर (Latur) जिल्हा ऑक्सिनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT