Imtiaz Jaleel latest News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवरून नसीम खान नाराज; MIMने दिली खुली ऑफर, आता काय निर्णय घेणार?

Imtiaz Jaleel latest News : नसीन खान यांच्या भूमिकेनंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी निवडणुकीसाठी खुली ऑफर दिली आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उत्तर मध्य लोकसभेत काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाली. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीनंतर नसीम खान यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे. नसीन खान यांच्या भूमिकेनंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी निवडणुकीसाठी खुली ऑफर दिली आहे. इम्तियाज जलील यांच्या खुल्या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नसीम खान यांनी काँग्रेस स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण दिलं आहे. नसीम खान यांच्या भूमिकेवर भाष्य करताना इम्तियाज जलील यांनी म्हटलं की, 'फक्त स्टार प्रचारक पदाचा राजीनामा का दिला? खरंतर तुम्ही पक्षाचा राजीनामा द्यायला हवा. त्या पक्षाला मुस्लिम समाजाची मते हवीत, पण त्यांचं नेतृत्व त्यांना नको आहे. तुम्ही एमआयएमच्या तिकिटावरून का लढत नाही? आम्ही तुम्हाला मुंबईची जागा द्यायला तयार आहे. तुम्हाला चांगली संधी आहे, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता'.

नसीम खान यांचं म्हणणं काय?

नसीम खान यांचं म्हणणं आहे की, 'राज्यात एकूण ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. महाविका आघाडीने एकाही मुस्लीम समाजाच्या उमेदवाराला तिकीट दिलं नाही. राज्यातील अनेक मुस्लिम संघटना, नेते, पक्षातील कार्यकर्त्यांचं म्हणणे आहे की, किमान एक तिकीट मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला मिळावं, अशी अपेक्षा होती. पण असं काही झालं नाही'.

'काँग्रेसला मुस्लिम समाजाचे मते पाहिजेत, पण उमेदवार का नको? या कारणामुळे मुस्लिम समाजासमोर जाऊ शकत नाही. माझ्याकडे त्याचं उत्तर नाही. यामुळे स्टार प्रचारकपदाचा राजीनामा देतो, असं मत नसीन खान यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

Soaking mangoes: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवला जातो?

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT