SSC HSC Examination 2024 Saam TV
महाराष्ट्र

HSC SSC Result: मोठी बातमी! दहावी, बारावीच्या निकालाची तारीख ठरली; कुठे अन् कसा पाहाल निकाल?

Maharashtra Board Exam Result: दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. त्यामुळे बारावीचा निकालाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

Satish Daud

Maharashtra Board HSC SSC Result

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. त्यामुळे बारावीचा निकाल २५ मेच्या आधी तर दहावीचा निकाल ६ जून पूर्वी लागण्याची शक्यता आहे.

त्यादृष्टीने राज्य मंडळ जलदगतीने तयारी करीत असल्याची माहिती राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. यंदा महाराष्ट्रात दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च आणि बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च यादरम्यान घेण्यात आली.

एकूण ३ हजार ३२० परीक्षा केंद्रांवर बारावीच्या तर, ५ हजार ८६ केंद्रावर दहावीची परीक्षा घेण्यात आल्या होत्या. दहावी आणि बारावीच्या तब्बल ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा परीक्षा दिली होती. यासाठी महामंडळाने जोरदार तयारी करत अनेक ठिकाणी कॉफीमुक्त केंद्र पाहायला मिळाले होते.

दरम्यान, दहावी आणि बारावीचा निकाल लवकर लागण्याच्या दृष्टीने जलदगतीने तयारीला सुरुवात झाली आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचे काम काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे बारावीचा निकाल २५ मेच्या आधी तर दहावीचा निकाल ६ जून पूर्वी लागण्याची शक्यता आहे.

दहावी-बारावीचा निकाल कुठे चेक कराल?

विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी दरवर्षी बोर्डाकडून अधिकृत वेबसाईट जारी करण्यात येते. विद्यार्थी mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन निकाल बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT