Maharashtra Weather Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: महाराष्ट्रात IMDचा इशारा, मुंबई-पुण्यासह अनेक भागात पावसाची शक्यता

राज्याच्या हवामानात पुन्हा एकदा बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengal) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अंदमान निकोबारमध्ये (Andaman Nikobar) चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्याच्या हवामानात पुन्हा एकदा बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengal) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अंदमान निकोबारमध्ये (Andaman Nicobar) चक्रीवादळ (Cyclone) येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येईल. त्यामुळेच हवामान खात्याने (IMD) अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच, मुंबई पाऊस, पुणे, कोकणासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडू शकतो, असे आयएमडीने सांगितले आहे.

पुढील 12 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात तापमानात घट झाली आहे. तसेच आकाशात काळे ढग आले असून पुण्यात ढगाळवतावरण आहे, असे असूनही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Marathwada) हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भातही (Vidarbha) उष्मा कायम राहण्याची शक्यता आहे.

तसेच, रविवारी भारतातील (India) अनेक राज्यांमध्ये पाऊस झाला आहे. यासोबतच IMD ने महाराष्ट्रातील विदर्भात सुद्धा पावसाचा इशाराही जारी केला होता. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही हवामानात बदल झाला आहे. मुंबईमध्ये देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तर सतत वाढत असलेल्या तापमानातही घट झाली आहे. मुंबईतही तापमान घसरल्याची स्थिती आहे.

हे देखील पहा-

त्याचवेळी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली आहे. मंगळवार आणि बुधवारी कोकण आणि गोव्याच्या (Goa) काही भागात पावसाची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT