Weather Update News: केरळनंतर आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. काल म्हणजेच ११ जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले. त्याचबरोबर येत्या ३-४ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिला आहे. (Latest Marathi News)
कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला इथे आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सोबतच राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण विदर्भात 15 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. आज हवामान विभागाकडून महाराष्ट्रात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. (Wetaher Update)
मुंबईत आज मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार
प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये (Mumbai) आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्येही १३ ते १५ जून या कालावधीत हलक्या सरींचाच अंदाज आहे.
यावर्षी महाराष्ट्रात मान्सून 4 ते 5 दिवस उशिरानं दाखल झाला आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच, हवामान विभागाने येत्या तीन ते चार तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे, IMD ने याबाबत माहिती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.