Maharashtra Weather Update Saam tv
महाराष्ट्र

Winter Alert : महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी! परभणीत तापमान ६ अंशावर; इतर जिल्ह्यात हवामान कसं?

Maharashtra Weather Update News : राज्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरल्याने कडाक्याची थंडी जाणवत आहे. परभणी येथे राज्यातील नीचांकी ६° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून निफाड ८°, पुणे ९.५°, नागपूर १०.६° इतके किमान तापमान नोंदवले गेले आहे.

Alisha Khedekar

  • परभणीमध्ये राज्यातील नीचांकी ६° सेल्सिअस तापमानाची नोंद

  • निफाड ८°, पुणे ९.५°, नागपूर १०.६° सह अनेक जिल्ह्यांत पारा १०° खाली

  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढला

  • तापमानात चढ उतार कायम राहण्याची शक्यता

राज्यात तापमानाचा पारा भलताच घसरल्याने कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने वातावरण ढगाळ स्वरूपाचं आहे. तसेच सकाळी आणि राती हवेत गारवा, धुके आणि दव पाहायला मिळत आहेत. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज तापमानात चढ उतार सुरु राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढला आहे.

काल परभणी येथे ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे ७ अंश सेल्सिअस, धुळे येथे ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर पुणे, नाशिक, जेऊर, भंडारा, गोंदिया येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. आज राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आहे. तसेच वातावरणात गारठा असून तापमानात चढ उतार असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास, तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. आज मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला आहे. परभणीमध्ये राज्यातील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान ?

निफाड : ८

पुणे: ९.५

जळगाव: ११

कोल्हापूर: १४.८

महाबळेश्वर: १२.२

मालेगाव: १२

नाशिक: १०

सांगली: १३.५

सातारा: १०.५

सोलापूर: १४

छत्रपती संभाजीनगर: १०.६

परभणी: ६

बीड: १०.५

अकोला: १४.५

अमरावती: ११.५

बुलढाणा: १३.४

गोंदिया: १०

नागपूर: १०.६

वाशीम: १०.६

वर्धा: ११.५

यवतमाळ: ११

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT