imd issues rainfall alert maharashtra vidarbha marathwada pune districts  Saam TV
महाराष्ट्र

Weather Update: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम; आज पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Rain Update: भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे.

Satish Daud

Maharashtra Rain Alert

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. खरीप हंगामातील पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय हवामान खात्याने (IMD) जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता आहे. हवामान विभागाने पुण्यासह नाशिक, अहमदनदर, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

यासोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची (Rain Alert) शक्यता आहे. अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. यापार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची सरी कोसळण्याची शक्यता आहे.

निकोबार बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य मान्सून राज्याच्या दक्षिण भागात सक्रिय झाला आहे. दक्षिण अंदमान समुद्रालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असल्याने परिणामी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, येत्या २४ तासांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज कायम असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. सरकारने झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT