Maharashtra Rain News Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast: राज्यात विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्याला अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

Maharashtra Weather Update: आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

Satish Daud

IMD Rain Alert in Maharashtra Today

उत्तरेत सक्रिय असलेला थंड हवेचा प्रवाह किनारपट्टीपर्यंत येत असल्याने बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण झालंय. परिणामी आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यांना तर गारपीटीने देखील तडाखा दिला आहे. ज्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांची नासधूस झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. (Latest Marathi News)

अशातच शेतकऱ्यांना सावरण्याची एकही संधी न देता, पुन्हा अवकाळी पाऊस अन् गारपीट होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील दोन दिवस नागपूरसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यात पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आला आहे.

तर मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रात पुणे तसेच नगर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी तुफान गारपीट होऊ शकते, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

आज, सोमवारी मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. खानदेशात जळगाव व धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

SCROLL FOR NEXT