Maharashtra Weather Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Maharashtra Weather : राज्यात मॉन्सून परतल्यानंतरही काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, नाशिक, कोल्हापूर भागात हवामानात बदल दिसून येत असून ‘ऑक्टोबर हीट’ची तीव्रता कायम आहे.

Alisha Khedekar

  • राज्यातून मॉन्सून परतल्यानंतरही काही ठिकाणी पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे

  • कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे

  • तापमानाचा पारा वाढून ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा कायम आहे

  • अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने हवामानात पुन्हा बदलाचे संकेत दिसत आहेत

महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्यानंतर आता काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान तयार झालं आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजा आणि वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानासह उन्हाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. उन्हाची ही झळ तापदायक ठरत आहे.

तर रविवारी रायगड, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यात विजा आणि वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असून बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३४ अंश सेल्सिअसच्या वर पोहचला आहे. तर सांताक्रुज येथे कमाल ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यात पावसाची उघडीप असली तरी कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा ३५ पार पोहोचला आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे उकाडा वाढला आहे. ‘ऑक्टोबर हीट’चा ताप वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर साखर कारखान्याच्या विजयी उमेदवारांचे अजितदादांना अभिवादन; जय पवारांची उपस्थिती

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT