Maharashtra Rain Alert Maharashtra Weather Updates Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert: राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार; पुढील ३-४ तासांत 'या' जिल्ह्यांना झोडपणार

Satish Daud

Rain Alert in Maharashtra

मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. नागरिकांना कधी उन्हाच्या झळा, तर कधी थंडीच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. येत्या ३-४ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, रायगड, बीड, सातारा जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा अंदाज आहे.  (Latest Marathi News)

त्याचबरोबर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता असून वाऱ्याचा ताशी वेग ३० ते ४० किमी असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला आणि बुलढाण्यात देखील आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

रविवारी मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला होता. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत उकाडा जाणवत होता. या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबई, ठाण्यासह उपनगरात अवकाळी पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT