Maharashtra Cold Wave
Maharashtra Cold Wave Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Cold Wave : राज्यात थंडीची लाट! 'या' जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, रस्त्यांवर दाट धुक्यांची चादर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Weather Update : थंडीसह राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. राज्यातही गेल्या दोन दिवसांपासून थंडीचं प्रमाण वाढलं आहे. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. रस्त्यात बहुतांश भागांमध्ये तापमान चांगलंच कमी झालं आहे. काडकाच्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे.

पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात थंडी वाढणार

पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात येत्या काही दिवसात थंडीत वाढ होणार आहे. अफगाणिस्तानात पुन्हा दोन चक्रवात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतात हिमवृष्टीसह पावसाची शक्यता असल्याने राज्यातही त्याचा परिणाम जाणवणार आहे. येत्या काही दिवसांत थंडीत वाढ होणार आहे. निफाडमध्ये आज १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून थंडीचा पारा पुढील काही दिवसांत घसरण्याची शक्यता आहे.

ढगाळ वातावरण आणि थंड वाऱ्यांनी नंदूरबार गारठले...

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच सहा दिवसांपासून हवामानात बदल झाला असल्याने तापमानाच्या पारा घसरला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव, मोलगी, अक्कलकुवा या भागात ढगाळ वातावरण असून धुक्याची चादर पसरली आहे सपाटी भागात 11 अंश सेल्सियस पेक्षा कमी आहे, तर सातपुड्याच्या दुर्गम भागात 9 अंश सेल्सिअस तापमान आहे. तापमानात घट होत असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना फायदा होणार आहे. मात्र तापमानाच्या पारा आणखीन घसरल्याने रब्बी हंगामातील पिकांवर बुरशीजन्य रोग येण्याच्या अंदाज देखील कृषी विज्ञान केंद्र कडून वर्तवण्यात आले आहे.

बुलढाण्यात पसरली धुक्याची चादर

बुलढाणा जिल्ह्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहे. काल दिवसभर वातावरणामध्ये गारवा पसरला होता, तर आज सकाळपासूनच धूक्याची मोठी चादर पसरली आहे. त्यामुळे सकाळी चालकांना आपल्या वाहनाचे लाईट सुरु करून वाहने चालवावी लागत आहेत. तर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना या धुक्यामुळे महाबळेश्वरचा फील येत होता. आजही वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा पसरला आहे.

लातुरात उशिराने सूर्यदर्शन

लातूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच भाग सकाळी दाट धुक्याने व्यापला होता. सूर्यकिरणे डोकावत असतानाच गाव आणि शिवार या धुक्यात हरवून गेल्यामुळे सकाळी तब्बल तीन तास उशिराने सूर्यदर्शन झाले.

अहमदनगरमध्ये पसरली धुक्याची चादर

अहमदनगर शहर आणि परिसरात सकाळपासून जाड धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे वातावरण आल्हाददायक झालं असलं तरी रस्त्यावरील वाहनांना मार्ग काढण्यास अडथळा निर्माण होत आहे याबरोबरच रब्बीतील गहू हरभरा या पिकांना धुक्यामुळे मोठा फटका बसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madha Constituency: झुकणार नाही लढणार! निवडणुकीनंतर अनेक गोष्टींना तोंड देण्याची माझी तयारी; धैर्यशील मोहिते पाटलांचे फडणवीसांना प्रतिआव्हान

Bhabha Hospital News : पेशंटकडून नर्सला मारहाण, कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन

Panchayat 3 Released Date : अखेर ठरलं..., 'पंचायत ३' याच महिन्यात रिलीज होणार; कहाणीत कोणता नवा ट्वीस्ट येणार ?

Today's Marathi News Live : राणे-तटकरेंचा पराभव करण्यासाठी ठाकरे पितापुत्र कोकणात

Raju Patil News : आम्ही सतत पाठिंबा द्यायला बसलेलो नाही, राजू पाटील यांचा महायुतीला इशारा?

SCROLL FOR NEXT