भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे. धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी सांगलीच्या वाळवामध्ये केलं आहे.
सोमवारी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती समारंभामध्ये ते बोलत होते. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने हे निवडून आले आहेत आणि त्यांचं अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजीला थेट पाकव्याप्त काश्मीर म्हणून उपमा दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनेक विरोधी पक्षातील नेते यावरून त्यांच्यावर टीका करत आहेत.
हर्षवर्धन पाटील यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, ''पाकव्याप्त काश्मीर असेल तर तुमचं सरकार होतं, तुमचं सरकार आहे, त्यांनी याचा शोध घ्यावा. प्रामाणिकपणे इचलकरंजीमध्ये राहताय, त्यांची तुलना पाकिस्तानशी करणं हा मूर्खपणा आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.