TUKARAM MUNDHE REMOVED AS PARBHANI GUARDIAN SECRETARY; DR CHANDRAKANT PULKUNDWAR GETS CHARGE saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! चार महिन्यातच तुकाराम मुंढेंना पालक सचिवपदावरून हटवलं

IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्याकडील परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्या जागी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • तुकाराम मुंढे हे सध्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

  • मंत्रालयातील सचिव पदावर नसल्यामुळे त्यांच्या पालक सचिवपदाची जबाबदारी काढून घेण्यात आल्याची माहिती

  • ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावलाय. त्याचदरम्यान मुंढे यांच्याकडे असलेल्या परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी काढण्यात आली आहे. तुकाराम मुंढे ऐवजी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे आता परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे हे या आधी मंत्रालयात सचिव असताना त्यांच्याकडे परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता ते सचिव नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली पालक सचिवपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे आता परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी असेल. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे सध्या राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव आहेत.

पालक सचिव (Guardian Secretary) म्हणजे काय?

एखाद्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाकडून पालक सचिवपदी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात असतो. हे पद महत्त्वाचं मानलं जातं. त्या माध्यमातून शासनाचे धोरणात्मक निर्णय, कल्याणकारी योजना यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालक सचिवाकडे असते.

संबंधित जिल्ह्याच्या पालक सचिवाला वर्षातून चार वेळा किंवा तीन महिन्यातून किमान एकदा दौरा करून विकासकामांचा आढावा घ्यावा लागतो. त्या जिल्ह्याच्या विकासासाठी नेमके उपाय सूचवण्याची, तसा अहवाल सूचवण्याची जबाबदारी पालक सचिवावर असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT