IAS TUKARAM MUNDHE ON GEN Z: RIGHT DIRECTION CAN MAKE INDIA A GLOBAL SUPERPOWER 
महाराष्ट्र

तरुणांना दिशा दिली तर देश जगात पावरफुल बनेल; Gen-Z बाबत काय म्हणाले IAS तुकाराम मुंढे?

IAS Tukaram Mundhe on Gen Z: आयएएस अधिकारी आणि एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अमरावतीमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जर 'Gen Zला योग्य दिशा दाखवली, तर भारत जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनू शकतो.

Bharat Jadhav

  • आयएएस तुकाराम मुंढे यांनी तरुणांना योग्य दिशा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

  • अमरावतीतील 'संवाद तरुणांशी' कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

  • राष्ट्रनिर्माणात युवकांची भूमिका निर्णायक असल्याचे मुंढे म्हणाले.

'तरुणांना दिशा दिली तर जगात पावरफुल देश आपण बनवू शकतो. दिशाकडे कसं जायचं आणि जर दिशा आपण दाखवू शकलो तर जगाला आपण दिशा दाखवून जगामध्ये आपली सार्वभौम सत्ता होईल. जगातला सर्वात पावरफुल राष्ट्र बनवायला जास्त वेळ लागणार नाहीये,असं मत एफडीएचे आयुक्त तुकराम मुंढे मांडलेत.

अमरावतीच्या पीआर पोटे पाटील कॉलेजमध्यें संवाद तरुणांशी या कार्यक्रमात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. यावेळी तुकाराम मुंढे यांनी देशात झालेल्या झेन-जी आंदोलनाबाबतही भाष्य केलं. जगामधील सर्वात जास्त तरुण पिढी भारतामध्ये आहे. जगातली सर्वात मोठी संपत्ती आता कोणती असेल ते तरुण आणि तेही असे तरुण त्यांच्याकडे जिद्द आहे

. त्यांच्याकडे ज्ञान आहे, कष्ट अपार कष्ट करण्याची तयारी आहे, असे तरुण आपल्याकडे असताना तरी त्यांच्यामध्ये नैराश्य न्यूनगंड ही धोक्याची घंटा आहे. आणि धोक्याच्या घंटेला सर्व स्तरावरून आपल्याला काम कराव लागणार आहे ते सामाजिक स्तरावरती करावं, असं मुंढे म्हणालेत.

आताच्या पिढीली अयोग्य गोष्ट मान्य नाही

आताची नवीन पिढी आहे त्याला जुन्या रुढी परंपरा मान्य नाहीत. पण आधीच्या काळात आई-वडिलांनी सांगितलं जेथे उभं राहायचं म्हटलं तेथे उभं राहायचं. त्यांनी म्हणलं हे योग्य ते मान्य करायचं त्यांनी सांगितलं हे अयोग्य मान्य करायचं. मात्र आजच्या तरुण पिढीला विशेष करून झेनजीला हे मान्य नाही आणि त्याच्यात चुकीचं काहीच नाही, कारण आपण वास्तावादी असलं पाहिजे.

या तरुण पिढीला हायरर्की मान्य नाहीये, उतरण मान्य नाहीये. ते अमुक एक नेता म्हणून त्याला मान्य करत नाहीत. ते सर्वजण नेते आहेत, त्यांच्यामध्ये मध्ये लीडरशिपच्या सर्व क्वालिटी भरलेल्या आहे गरज फक्त आहे त्यांना योग्य दिशा दाखवण्याची ती दिशा दाखवण्यासाठी आपल्याला काम कराव लागणार आहे.

नव्या पिढीला साथ द्या

काही दिवसापूर्वी भारतामध्ये खूप मोठं आंदोलन झालं. त्यात झेन- जी आहेत त्यांना लीडरशिप अशी एक हायरर्की चालत नाही. प्रत्येक जण त्याच्यामध्ये लीडर आहे. का लीडर आहेत कारण त्यांच्यात अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत अस्पिरेशन आहेत. या पिढीलाआपण आळशी म्हणतो ज्यांच्यावर आपण प्रश्न करतो की ते आळशी आहे, असं म्हणतो. पण ही जनरेशन सर्वात जास्त क्लायमेट चेंजवर बोलते. ही जनरेशन सर्वात जास्त टेक्नॉलॉजीवर बोलते.

टेक्नॉलॉजीवरती काम करते ती जनरेशन मेंटल इलनेस मधल ओपनली बोलते म्हणजे माझ्या अगोदरच्या काळात किंवा माझ्या अगोदरच्या पिढ्यामध्ये जर बघितलं मेंटल नेस बघितल तर वेडा म्हणायचे. आज नवीन जनरेशन मध्ये तेवढं धैर्य आहे तेवढं र्धैर्य आहे की आमच्या मेंटल इलनेस आहे. ते इलनेस नाहीयेत एखादी गोष्ट स्वीकारण्यासाठी जे धैर्य लागतं ते त्यांच्यामध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशेज घाट मार्ग पुर्ण बंद; पर्यायी मार्गांवर रात्रभर वाहतूक कोंडी, पर्यटकांचे हाल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ₹१५००; जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

Rain Alert : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पुण्यासह ७ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Health Care : हात थरथरण्याचा लिव्हरशी काय संबंध? तरुणांमध्ये दिसून न येणाऱ्या आजारामागचं सत्य जाणून घ्या

अवघ्या ५ मिनिटांत करा दुधी भोपळ्याचे मऊ आणि कुरकुरीत थालीपीठ

SCROLL FOR NEXT