Pooja Khedkar Latest News 
महाराष्ट्र

Pooja Khedkar Case : मोठी बातमी! IAS अधिकारी पूजा खेडकर यांची मध्यरात्री 3 तास चौकशी; वाशिममध्ये नेमकं काय घडलं?

Pooja Khedkar Latest News : उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह दोन अधिकाऱ्यांकडून वाशिम येथील शासकीय विश्रामगृहात पूजा खेडकर यांची सोमवारी रात्री चौकशी करण्यात आली.

Satish Daud

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी तब्बल तीन तास चौकशी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह दोन अधिकाऱ्यांकडून वाशिम येथील शासकीय विश्रामगृहात पूजा खेडकर यांची सोमवारी रात्री चौकशी करण्यात आली. बंद खोलीत ही चौकशी झाली असल्याने चौकशीत खेडकर यांना काय विचारण्यात आलं? याबाबत कळू शकलेलं नाही.

दरम्यान, चौकशीनंतर पूजा खेडकर यांनी माध्यमांसोबत बोलण्यास नकार दिला. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर या गोत्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्यावरील झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती नेमली आहे, त्या समितीने अहवाल मागवला आहे.

पूजा खेडकर यांच्या नियुक्तीबाबतही अनेक आरोप करण्यात आले आहेत. खेडकर यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षेत (UPSC Exam) पात्र होण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्रांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. तसेच खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून तब्बल ११ वेळा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्याचंही समोर आलं आहे.

त्यामुळे पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी दिव्यांग संघटनांनी केली आहे. याबाबत दिव्यांग संघटनेकडून अपंग कल्याण आयुक्तांना तक्रार अर्जही देण्यात आला होता. दरम्यान, वेगवेगळ्या आरोपानंतर खेडकर यांची पोलिसांनी चौकशी करण्यात आली.

सोमवारी रात्री वाशिम (Washim News) इथल्या विश्रामगृहातील निवासस्थानी पोलिसांची टीम दाखल झाली आहे. या टीममध्ये तीन महिला पोलीस आणि इतर ६ पोलीस होते. रात्री इतक्या उशीरा तीन महिला पोलीस अधिकारी पूजा खेडकर यांच्या रूममध्ये कोणत्या चौकशीसाठी आल्यात? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, नियमबाह्य पद्धतीने वागल्याचा आरोप झाल्यानंतर पूजा खेडकर यांची पुणे येथून वाशिमला बदली करण्यात आली आहे. वादांच्या या मालिकांनंतर पूजा खेडकर पहिल्यांदाच समोर आल्या आहेत. समिती मला जे प्रश्न विचारेल त्याची उत्तरं मी त्यांना देईन. समितीचा निर्णय मला मान्य असेल, असं पूजा खेडकर म्हणाल्या आहेत. गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक जण निदोर्ष हे आपलं संविधान सांगतं, असंही त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैसावर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT