मी इतकी मोठी नाही की भाजपा मला संपवण्यासाठी काम करेल Saam tv
महाराष्ट्र

'मी इतकी मोठी नाही की भाजपा मला संपवण्यासाठी काम करेल'

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंत्रिमंडळात (कॅबिनेट) स्थान मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन (Congratulations) केले आहे

Anuradha Dhawade

मुंबई : मी नाराज नाही, ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं त्या सर्वांना मी कॉल करुन अभिनंदन केले आहे. भारती पवार, भागवत कराड, नारायण राणे आणि कपिल पाटील या सर्वांना शुभेच्छा दिल्या. अशा शब्दात भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली भूमिका मांडली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची सर्वाना खात्री होती. मात्र ऐन वेळी भागवत कराड (Bhagvat Karad) यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळाले, त्यावरुन पंकजा मुंडे (pankaja Munde)आणि प्रीतम मुंडे (Pritam Munde) नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता स्वतः पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. (I am not so big that BJP will work to end me)

''मंत्रिपद न देऊन भाजपाने अन्याय केला असे काही नाही. अनेक नेत्यांची नवे चर्चेत होती. पक्ष वाढविण्यासाठी पक्षाचे नेते निर्णय घेत असतात. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हरकत नाही. भाजपात एक पद्धत आहे त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. पक्षाची ताकद वाढेल असे नेत्यांना वाटते म्हणून नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली असावी. असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. तर, विधान परिषदेच्या वेळी पक्षाने मला फॉर्म भरायला लावला होता, तेव्हाही मी पात्र आहे का असं विचारलं होतं. नंतर पक्षाने रमेश आप्पा कराड यांचं नाव अंतिम झाल्याचं सांगितलं होतं. तो निर्णयही मी मान्य केला आणि आताचा निर्णयही आम्ही मान्य केला आहे. त्यामुळे कोणी नाराज असण्याचं कारण नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही तर व्रत म्हणून आली आहे. त्यामुळे भाजप ला मला संपवायचे आहे असे मला वाटत नाही. कारण मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही तर व्रत म्हणून आली आहे. मी इतकी मोठी नाही की पंतप्रधान मला संविण्यासाठी असे करतील. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी मी राजकारणात आले. गोपीनाथ मुंढेंनी या विखुरलेल्या समाजाची बसवलेली घडी विस्कटू नये, आता ही माझी जबाबदारी आहे. मी वंजारी समाजाबरोबरच राज्याच्या इतर जनतेची देखील नेता आहे. वंजारी समाजातील नेता मोठा होत असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभी असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितल.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT