Nitesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

Nitesh Rane: “मी सरेंडर होण्यासाठी जातोय” म्हणत नितेश राणे कोर्टाच्या दिशेने रवाना

नितेश राणे शरण आल्यावर त्यांची कोठडी मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावेळी दिली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिंधुदुर्ग: भाजप आमदार नितेश राणे कोर्टात शरण येणार असल्याची माहिती नितेश राणेंचे (Nitesh Rane) वकील सतीश मानेशिंदे यांनी यावेळी दिली आहे. तर नितेश राणे शरण आल्यावर त्यांची कोठडी (cell) मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावेळी दिली आहे. संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे.

हे देखील पहा-

अगोदर तीनवेळा जामीन फेटाळल्यावर चौथ्यांदा काल सत्र न्यायालयाने (court)जामीन फेटळला आहे. यानंतर राणेंनी परत एकदा हायकोर्टात (High Court) धाव घेतली आहे. मात्र, आज राणेंची वकील सतीश मानेशिंदे यांनी नितेश राणे कोर्टासमोर शरण येणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे परत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच नितेश राणे यांनी आता एक सूचक ट्विट देखील केले आहे.

अमित शाह (Amit Shah) यांचा फोटो पोस्ट (Post) करत समय बलवान है, इन्सान खामो खा गुरुर करता है असे ट्विट (Tweet) नितेश राणे यांच्याकडून करण्यात आल्याने राणेंचा नेमका रोख कुणाकडे आहे? अशा राजकीय (Political) चर्चांना उधाण येत आहे. कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवत मी कोर्टासमोर शरण यायला जात आहे.

आजपर्यंत राज्य सरकारने (State Government) वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीररित्या मला अटक करण्याचा प्रयत्न केला, अशी छोटीशी मात्र सूचक प्रतिक्रिया शरण येण्याअगोदरच नितेश राणे यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे. नितेश राणे यांची कोठडी पोलीस मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावेळी दिली आहे. यामुळे राणेंना आता कोर्ट कोठडी देणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajgad To Pratapgad: राजगड ते प्रतापगड प्रवास कसा कराल? बस, रेल्वे आणि खासगी वाहन मार्ग

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण प्रकरण, आरोपीच्या भावाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Pune News : नवीकोरी स्कूटर महिन्यात खराब, पट्ट्याने शोरूमला नेली अन् पेटवून दिली, पुण्यातील घटना

Beed News: वाल्मिक कराडकडे सापडला स्पेशल फोन, भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ; बीड पोलिस संशयच्या भोवऱ्यात|VIDEO

Raigad : धक्कादायक! रायगडमध्ये उघड्या दरवाजाने एसटी धावली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT