Divorce Saam TV
महाराष्ट्र

घटस्फोटानंतर बायकोला द्यावी लागणार नवऱ्याला 'पोटगी' हायकोर्टाचा आदेश (पहा Video)

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद : घटस्फोट (Divorce) दिल्यानंतर घटस्फोटीत महिलेला पतीकडून पोटगी द्यावी असे निकाल यापूर्वी आपण अनेकदा पाहिले आहेत. पण आता एका प्रकरणात घटस्फोटीत पत्नीने (Divorced Wife) पतीला पोटगी द्यावी असा नांदेड जिल्हा कोर्टाचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला आहे. त्यामुळे त्या पतीला पत्नीकडून पोटगी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

सरकारी नोकरीत असलेल्या बायकोने उत्पन्न नसलेल्या घटस्फोटित नवऱ्याला पोटगी देण्याचा आदेश नांदेडच्या जिल्हा कोर्टाने (District Court of Nanded) होता. त्याविरोधात पत्नीने औरंगाबाद हायकोर्टात (Aurangabad High Court) धाव घेतली होती. नांदेड कोर्टाने दिलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत पत्नीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. नांदेडमधील एका दांपत्याचे 1992 मध्ये लग्न झाले होते.

त्या काही कारणांमुळे पत्नीने घटस्फोटासाठी नांदेड मधील दिवाणी न्यायालय येथे अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या सुनावणीच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर न्यायालयाने 2015 मध्ये या पती-पत्नीचा घटस्फोट मंजूर केला होता, मात्र पतीजवळ उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नव्हेत, तर पत्नी सरकारी नोकरीत असून तिला चांगला पगार आहे. तीला नोकरी लागण्यामागे तसचं ती ज्या पदावर आहे, तिथं जाण्यासाठी तिच्या पतीचेही योगदान मोठे असल्यामुळे आता आपणाला उदरनिर्वाहासाठी पत्नीने काही पोटगीची रक्कम द्यावी, अशी मागणी पतीने केली होती.

पहा व्हिडीओ -

कोर्टाने पचीचा विनंती अर्ज विचारात घेऊन, दिवाणी न्यायालयाने हिंदू विवाह अधिनियम 1955 च्या कलम 24 व 25 अन्वये घटस्फोटानंतर पत्नीने पतीस स्थायी पोटगी व निर्वाह खर्च म्हणून काही रक्कम देण्याचे आदेश दिले होते. मात्र पत्नीने त्या आदेशाविरोधात खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. मात्र नांदेड कोर्टाचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT