जुन्नरमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने केली ५१ वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या !  SaamTvNews
महाराष्ट्र

जुन्नरमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने केली ५१ वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या !

आरोपी सुरेश शिंदे याने मद्यप्राशन केले होते व त्यात त्याने चारित्र्याच्या संशयाचा राग मनात धरून पत्नी संध्याचा हाताने गळा दाबून खून केला.

रोहिदास गाडगे

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील नगदवाडी जवळील कांदळी शिंदे मळा याठिकाणी चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी नारायणगाव (Narayangaon) पोलिसांनी आरोपी पतीस ताब्यात घेतले आहे. वडिलांनी आपल्या आईचा खून केल्याची फिर्याद सुशांत शिंदे यांनी दिली असल्याची माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

हे देखील पहा :

संध्या सुरेश शिंदे (वय ५१) असे चारित्र्याच्या संशयातून खून (murder) झालेल्या महिलेचे नाव आहे. सुरेश दगडू शिंदे (वय-५९, रा. शिंदे मळा नगदवाडी (Nagadwadi) कांदळी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. या बाबतची फिर्याद सुशांत सुरेश शिंदे (वय-३१, रा. शिंदे मळा नगदवाडी कांदळी) यांनी दिली आहे.

पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश याला पत्नीच्या (Wife) चारित्र्याबद्दल संशय होता व दोघांमध्ये अनेक वेळा भांडणे होत होती. १ जानेवारी रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. आरोपी सुरेश याने मद्यप्राशन केले होते व त्यात त्याने चारित्र्याच्या संशयाचा राग मनात धरून पत्नी संध्याचा हाताने गळा दाबून खून केला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT