Kolhapur Saam
महाराष्ट्र

Kolhapur: ज्योतिबाच्या डोंगरावर नेलं अन् बायकोला संपवलं, चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याचं भयानक कृत्य

Kolhapur Crime News: चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची निघृण हत्या केली असल्याची घटना कोल्हापुरातील ज्योतिबाच्या डोंगरावर घडली आहे. या घटनेनंतर त्याने स्वत: खून केल्याची कबुली दिली.

Bhagyashree Kamble

चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची निघृण हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगर परिसरात घडली आहे. या घटनेनंतर आरोपी पतीने सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशन गाठत पत्नीची हत्या केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तपासाला सुरुवात केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सचिन चंद्रशेखर राजपूत असे आरोपीचे नाव आहे. तर, शुभांगी सचिन राजपूत असे मृत महिलेचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याच्या डोक्यात संशयाने घर तयार केलं होतं. आरोपीने आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला. सचिन आपल्या पत्नीला ज्योतिबा डोंगराच्या निर्जनस्थळी घेऊन गेला. नंतर त्यांनी एकमेकांसोबत गप्पा मारल्या.

गप्पा मारत असताना बेसावध असलेल्या शुभांगीवर सचिनने चाकूने सपासप वार केले. चेहरा, गळा आणि पोटावर वार करत तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह बंदिस्त करून तो तिथून सोलापूरला निघून गेला होता. नंतर त्याने सोलापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे. आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केल्याची कबुली दिली आहे.

“मी कोल्हापुरातून आलो आहे. पत्नीवर चाकूने वार करून तिला घरात बंद करून आलो आहे,” अशी थरारक कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तपासाला सुरुवात केली. कोल्हापूर पोलिसांनी सोलापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कासारवाडी डोंगर परिसरात शोधमोहीम राबवून शुभांगीचा मृतदेह ताब्यात घेतला.

सचिन राजपूत हा भारतीय सैन्यात आठ वर्ष कार्यरत होता. मात्र, महिलेसोबत अश्लील वर्तन प्रकरणी त्याला सेनेतून बडतर्फ करण्यात आले होते. आता त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन थेट खून केल्याची कबुली दिली आहे. सध्या कोल्हापूर पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT