औरंगाबाद: शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा क्रांतिचौकात विराजमान माधव सावरगावे
महाराष्ट्र

औरंगाबाद: शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा क्रांतिचौकात विराजमान

पुतळा चबुतऱ्यावर बसवण्यात 48 तास लागले आहेत.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरातील क्रांती चौकात दाखल झाला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर चबुतऱ्यावर बसवण्यात 48 तास लागले तर, पहाटे पाच वाजता हा पुतळा चबुतऱ्यावर बसवण्यात आले आहे. या पुतळ्याचे उद्घाटन 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहरातील मुख्य क्रांती चौकात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा काल पहाटे औरंगाबादेत दाखल झाला होता. शिवप्रेमी आणि औरंगाबादकरांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा औरंगाबादेत दाखल झाल्यानं येत्या काही दिवसांतच पुतळा उभा केला जाणार आहे. त्यासाठी औरंगाबाद शहरातील मुख्य क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

हे देखील पहा-

तर, तब्बल ३१ फूट उंचीचा चौथरा उभारण्याचे काम पूर्ण झाले. या चौथऱ्यावर तब्बल २१ फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुण्याच्या चित्रकल्पक आर्ट येथे पुतळा तयार करण्यात आलाय. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजयंती आहे. त्यापूर्वी सर्व कामे महापालिकेकडून पूर्ण करण्यात येणार आहेत. पुतळ्याच्या चौथच्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

पुतळ्यासाठी १ कोटी रुपये खर्च करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू होते. त्याच सोबत पुणे येथे पुतळा तयार करण्याचे कामही सुरू होते. औरंगाबाद शहरातील क्रांती चौक आणि शिवाजी महाराजांचा पुतळा हा औरंगाबादची ओळख आहे. मात्र, त्याठिकाणी उड्डाणपूल झाल्यानं शिवाजी महाराजांचा पुतळा दोन्ही बाजूने झाकला गेला होता. शिवप्रेमी आणि औरंगाबादकरांनी हा पुतळा उंच करण्याची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT