HSC Paper Saam Tv
महाराष्ट्र

HSC Exam: शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना पुरवली कॉपी; बोर्डाच्या CCTV कॅमेऱ्यात सगळं काही रेकॉर्ड, सामूहिक कॉपी प्रकरणी मोठी कारवाई

HSC English Paper Group Copy Caught in CCTV: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बारावीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक पद्धतीने कॉपी केली आहे. शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवली आहे.

डॉ. माधव सावरगावे

बारावीच्या परीक्षेत सामुहिक कॉपी

छत्रपती संभाजीनगरमधील घटना

शिक्षकच विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार

बारावीच्या पहिल्याच इंग्रजी पेपरला सामूहिक कॉपी केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. बोर्डानं लावलेल्या सीसीटीव्ही समोर बसूनच विद्यार्थ्यांनी कॉपी केली आहे. फक्त विद्यार्थी नव्हे तर सामूहिक कॉफीमध्ये त्या परीक्षा केंद्रावरचे केंद्रप्रमुख शिक्षक आणि कर्मचारी सहभागी होते. याप्रकरणी आता बोर्ड आणि शिक्षण विभागाने कठोर कारवाई सुरू केली.

याप्रकरणी १९ कर्मचाऱ्यांवर देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी त्या केंद्रातील सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. कास्टेडियन मार्फत या उत्तरपत्रिका मागवण्यात येणार असून त्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर करवाई करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या जैतापूरच्या राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना पर्यवेक्षकांसह इतर शिक्षक, कर्मचाऱ्यांनीच परीक्षार्थीना इंग्रजीच्या पेपरसाठी प्रश्नांची उत्तरे पुरवली. त्यानुसार अनेक विद्यार्थी एकाच बाकड्यावर बसून सामूहिक उत्तरे लिहत होते. भरारी पथक येणार त्यावेळी सगळीकडे चिडीचूप झाले. मात्र, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांचे पथक केंद्रावर पोहचल्यानंतर त्यांना एकसारखी उत्तरे असणारे ९ कागद सापडले. त्यांना सामूहिक कॉपी झाली असल्याची शंका आली आणि त्यांनी केंद्रावरचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले.

या परीक्षा केंद्रातील एकूण १४ वर्गात ३३४ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यातील ३२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. वर्गामध्ये मंडळाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही बसविलेले आहेत. त्या सीसीटीव्हीमध्ये विद्यार्थी एकमेकांच्या बेंचवर उठून बसत कॉपी करत असल्याचेही दिसले. धक्कादायक म्हणजे केंद्रावरचे शिक्षक, केंद्रप्रमुख सगळे त्यामध्ये सहभागी झाल्याचे दिसले. आता कॉपी करणाऱ्या परीक्षा केंद्रावर अशीच कठोर कारवाई केली जाणार आहे, असं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदूरबारमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या 'मिलेट चॉकलेट'मध्ये किडे आणि अळ्या

Second hand car: सेकंड हँड गाडी घेताय? या गोष्टी नीट तपासून पाहाच

Teacher Transfers: शिक्षकांना मूळ गावी बदली नाहीच; बदलला बदलीचा नियम, सरकारचा मोठा निर्णय

Weight Loss: ना जिम ना कठोर डाएट; पैसे खर्च न करता करा वजन कमी, जाणून घ्या हा फायदेशीर उपाय

Birth Certificate : फक्त १० रूपयांत कोणत्याही वयात मिळवा जन्म दाखला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT