Nashik Train Fire Saam Tv
महाराष्ट्र

Nashik : नाशकात हावडा मेलच्या बोगीला भीषण आग; प्रवाशांची पळापळ, अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी

अभिजीत सोनावणे

Nashik News : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. हावडा मेलच्या बोगीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. नाशिकरोड (Nashik) रेल्वे स्थानकावरील मालधक्क्याजवळ हावडा मेलच्या बोगीला अचानक आग (Fire) लागली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरात गोंधळ उडाला आहे.(Howrah mail Catches Fire)

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. बोगीला आग लागल्यामुळे स्थानकावर धुराचे लोट पाहण्यास मिळत आहे. दरम्यान, या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हावडा मेल नाशिकरोड रेल्वे स्थानकात पोहचताच लागली आग. रेल्वेला आग लागल्याचे समजतच प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. सध्या अग्निशमन दलाकडून आग विजविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. हेड वायर तुटल्याने प्लॅटफॉर्म 3 वरील वाहतूक तूर्तास बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक प्लॅटफॉर्म 1 व 2 वर वळवण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबई कडे जाणारी रेल्वे विस्कळीत झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT