Hotel Bhagyashree saam tv
महाराष्ट्र

Hotel Bhagyashree : तुझे दिवस भरलेत, व्हिडीओ टाकू नकोस; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी

Hotel Bhagyashree News : तुळजापूरलगत असलेले हॉटेल भाग्यश्री सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या हॉटेलचे मालक, नागेश मडके यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Yash Shirke

बालाजी सुरवसे, साम टीव्ही, प्रतिनिधी

धाराशिव : तुळजापूरजवळील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'तुझे दिवस भरलेत, व्हिडीओ टाकू नकोस' असे म्हणत अज्ञात व्यक्तीने फोन करुन हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना धमकावण्यात आले आहे. या प्रकरणामुळे भाग्यश्री हॉटेल चर्चेत आले आहे.

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ टाकू नकोस, आम्हाला तुला जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे. तुझे दिवस भरत आले आहेत, असे अज्ञातांनी नागेश मडके यांना फोनवर म्हटल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी हॉटेल भाग्यश्रीबाहेर हाणामारी झाली होती. काही कारणांवरुन हॉटेलमधील कामगार आणि तरुणांमध्ये वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले होते. मारहाणीचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावल व्हायरल झाला होता. यानंतर नागेश मडके यांनी सुरक्षेसाठी पुण्याहून बॉडीगार्ड्स बोलावले होते.

मारहाणीच्या प्रकरणानंतर नागेश मडके यांनी 'आमच्या हॉटेलचे नाव होत आहे. मुलीला वाढदिवसाला फॉच्युनर एसयुव्ही कार भेट दिल्यानंतर हॉटेल राज्यभर चर्चेत आले. पण ही गोष्ट काही लोकांना बघवत नाही. त्यामुळे आसपासच्या परिसरातील काहीलोक मुद्दामून येथे गोंधळ घालतात. भांडण उकरुन काढतात. आमच्या हॉटेलची बदनामी व्हावी, ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहेत, असे म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 1100 कोटी रूपयांची ऊस बिले थकली

Success Story: फ्रान्समधून शिक्षण, ३० लाखांच्या पगाराची नोकरी सोडली; दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS कृष्ण कुमार बिश्नोई यांचा प्रवास

Jeera Ajwain Water Benefits: रोज सकाळी उठल्यावर जीरा ओवा पाणी प्यायल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

kolhapur shocking : मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती? पाटेगावचा माजी सरपंच तब्बल २ महिन्यांपासून बेपत्ता

Reliance Jioचे नवे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वाचा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT