Thirty First Rules Google
महाराष्ट्र

Thirty First Rules: चार बॉटल वोडका नव्हे तर फक्त ४ पेग; हॉटेल्स ५ वाजेपर्यंत राहतील सुरू पण..

Thirty First Rules: थर्टी फस्टसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आलीय. नवं वर्ष साजरं करण्यासाठी हॉटेल्स ५ वाजेपर्यंत खुले राहणार आहेत.

Bharat Jadhav

नवीन वर्ष साजरे करण्याचे नियोजन आपण सर्वांनी सुरू केले असेल. तर ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या पार्टी करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. काही लोक आपल्या कुटुंबासह काहीजण मित्रांसोबत हॉटेल किंवा रिसॉर्ट्समध्ये नवीन वर्षाचे स्वागत करतात. मात्र थर्टी फस्टसाठी हॉटेल्ससाठी नवीन नियम घालण्यात आले आहेत.

त्यामुळे थर्टी फस्टला तराट होणाऱ्या तळीरामांना आपल्या जीभेवर ताबा ठेवावा लागणार आहे. नववर्षानिमित्त दारूबंदी लागू करण्यात आली असून ३१ डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये लोकांना कमी दारू मिळणार आहे. हॉटेल्समध्ये फक्त चार पेग घेता येणार आहेत. त्यापेक्षा जास्त प्यायले पिण्यास परवानगी दिली जाणार नाहीये. दरम्यान हा नियम का घालण्यात आलाय याबाबत हॉटेल असोसिएशनने प्रतिक्रिया दिलीय.

अल्कोहोलच्या अतिरेकामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे नियम घालण्यात आलाय. पार्टीनंतर जेव्हा लोक घरी परतताना अपघात मोठ्या प्रमाणात घडत असतात. नशेत असताना लोकांकडून कोणतीही चूक होऊ नये, यासाठी हॉटेल असोसिएशनने निर्णय घेतलाय.

अपघात टाळण्यासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सना मद्य सेवा देण्यापूर्वी ग्राहकांचे वय निश्चित करण्यासाठी ओळखपत्रे तपासले जाणार आहेत, त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मद्यप्राशन करणाऱ्या ग्राहकांसाठी वाहनचालकांची व्यवस्था केली जाणार आहे. जेणेकरून ते दारूच्या नशेत वाहन चालवू नयेत.

सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, परमिट रूम आणि ऑर्केस्ट्रा बार ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. या नियमाचा उद्देश नवीन वर्षाची रात्र साजरी करण्यासाठी पुरेसा वेळ देणे हा आहे. परंतु जास्त मद्यपान टाळणे देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

Earthquake : हाहाकार! भूकंपाच्या धक्क्याने 'हा' देश हादरला; १०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT