Accident News Saam TV
महाराष्ट्र

Accident News : कार आणि घोड्याचा भीषण अपघात; नवरदेवाला मिरवून परतताना वाटेतच मृत्यू

Car and Horse Accident : कारने धडक दिली तेव्हा कारच्या फुटलेल्या कांचांमुळे घोड्याचा गळा चिरला गेला. त्याने तो गंभीर जखमी झाला. यातच त्याचा रस्त्यावर मृत्यू झाला. घोडा रस्त्यावरून जात असताना तो वेगात धावत होता.

Ruchika Jadhav

नाशिकमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. कार आणि घोड्याचा अपघात होऊन घोडा जागीच मृत्यू पावलाय. सदर घटनेमुळे घोड्याचा मालक दु:खी आहे. घोड्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवालीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकच्या त्र्यंबकनाका सिग्नल परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. मृत पावलेला घोडा एका लग्नावरून परतत होता. लग्नातील मिरवणुकीत त्याने नवरदेवाला छान नाचवलं. संपूर्ण मिरवणूक वाजत गाजत पार पडली. त्यानंतर घरी परतताना घोड्यावर काळाने घाला घातला.

चंपा असं या घोड्याचं नाव आहे. कारने धडक दिली तेव्हा कारच्या फुटलेल्या कांचांमुळे घोड्याचा गळा चिरला गेला. त्याने तो गंभीर जखमी झाला. यातच त्याचा रस्त्यावर मृत्यू झाला. घोडा रस्त्यावरून जात असताना तो वेगात धावत होता. त्याच्यासमोरून एक कार जात होती.

धावत धावत घोडा थेट समोर असलेल्या कारवर धडकला. कारवर धडकल्याने कारच्या मागील बाजूची कार फोडून तो आत शिरला. यावेळी काच फुटून त्याच्या मानेला लागली. काचेमुळे त्याची मान कापली गेली. त्यामुळे घोडा जखमी झाला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घोड्याला आणि अपघातग्रस्त कारला तेथून बाजूला करण्यात आले. तसेच वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. या अपघातात कारमधील कुणालाही काही दुखापत झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाजवा रे ढोल ताशा, T20 वर्ल्ड कप जिंकून आलाय सूर्यादादा! टीम इंडियाच्या कर्णधाराचं मुंबईत जंगी स्वागत| Video Viral

Maharashtra Live News Update : पुणे येथून अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची संगमनेर टोलनाक्यावर सुटका

युद्धाने टेन्शन वाढवलं, गणेशमूर्तींच्या पॅकेजिंगसाठी फोम मिळेना; छोटे उद्योजक हवालदील

लोकसभेत मोठा गोंधळ; प्रियंका गांधी बोलत असताना सत्ताधारी आक्रमक|VIDEO

Summer Health Tips: उन्हाळ्याच्या सुरुवातीला आरोग्याची घ्या नीट काळजी, या गोष्टी ठेवा सोबत; अन्यथा...

SCROLL FOR NEXT