Chhatrapati Sambhajinagar News Saamtv
महाराष्ट्र

Honeybee attack News: ह्रदयद्रावक! मधमाशांचा बाप लेकावर हल्ला; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा तडफडून मृत्यू

Crime News Update: कामावरुन घरी परतताना दोघांवर मधमाश्यांनी हल्ला चढवला. ज्यामध्ये सैय्यद सबदर इस्माईल यांचा दुर्देवी मृत्यू झाला...

Gangappa Pujari

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar News: कामावरुन घरी परतणाऱ्या बाप लेकावर मधमाश्यांनी जोरदार हल्ला चढवल्याचा घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये पित्याचा मृत्यू झाला असून जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैय्यद सबदर इस्माईल (वय ५८ वर्ष) असे मयत वडिलांचे नाव आहे. मुलगा आबिद सैय्यद सबदर हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील शिंदोली येथे ही घटना घडली आहे.. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सैय्यद सबदर इस्माईल व त्यांचा मुलगा अबीद सैय्यद इस्माईल हे दोघे कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी चार वाजता घराकडे परतत असताना शिंदोळ गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या झाडावर बसलेल्या मधमाश्या अचानक उठल्या. आणि चवताळलेल्या माशांनी दोघांवर जोरदार हल्ला चढवला.

अचानक झालेल्या या हल्ल्याने दोघेही घाबरुन गेले. यावेळी मधमाश्यांनी तोंडावर, डोक्यात आणि हात पायांवर जोरदार डंख मारले. या हल्ल्यात सैयद सबदर सैयद इस्माईल यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला.

या  घटनेची माहिती मिळाल्याने परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. व जखमी आबीद याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावर उपचार सुरू आहेत. मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांना जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.. (jalgaon News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गेल्या आठवड्याच सोनं 12500 रुपयांनी स्वस्त, आज काय झालं? वाचा 18-22 आणि 24 कॅरेटचे दर

Winter Foot Care : हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्यामागे फक्त कोरडेपणा नाही, 'ही' ८ कारणेही असू शकतात

Maharashtra News Live Update: पुण्यात सार्वजनिक उपक्रम समितीची बैठक सुरू; रिंग रोड, पुरंदर विमानतळासह महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा

China Moon Mission: चंद्रावर कब्जा मिळवण्यासाठी चीनचा मास्टरप्लॅन, 2050 पर्यंत सुरू करणार खाणकाम; नेमकं काय घडणार?

Kitchen Hacks : कांदा-लसणाचा उग्र वास चॉपिंग बोर्डवर चिकटलाय? मिनिटांत गायब करतील 'हे' ५ भन्नाट जुगाड

SCROLL FOR NEXT