Raigad Updates : रायगडातील ऐतिहासिक स्थळे, स्मारके होणार पर्यटकांसाठी खुली! राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Raigad Updates : रायगडातील ऐतिहासिक स्थळे, स्मारके होणार पर्यटकांसाठी खुली!

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने रायगडातील ऐतिहासिक स्थळे, स्मारके पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. त्यामुळे गड, किल्ले, स्मारक याठिकाणी पुन्हा पर्यटकांची रेलचेल सुरू होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने रायगडातील ऐतिहासिक स्थळे, स्मारके पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. त्यामुळे गड, किल्ले, स्मारक याठिकाणी पुन्हा पर्यटकांची रेलचेल सुरू होणार आहे. मुरुड जंजिरा किल्ला, रायगड किल्ला, कुलाबा किल्ला तसेच जिल्ह्यातील इतर ऐतिहासिक स्थळे सात महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुली होणार आहेत. केंद्राच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे जिल्हा प्रशासनाने ऐतिहासिक स्थळे, स्मारक पर्यटकांसाठी खुली करण्याची मागणी केली होती. कोरोना नियमांचे पालन करून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी अधिसूचना जाहीर केली आहे.

हे देखील पहा :

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा सर्व ऐतिहासिक स्थळे, स्मारके ही पर्यटनासाठी पर्यटकांना बंद केली होती. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे, स्मारक ही पर्यटनास बंद झाली होती. ऐतिहासिक पर्यटन स्थळे बंद झाल्याने याचा फटका हा स्थानिक व्यवसायिकांनाही बसला. त्यामुळे कोरोनामुळे त्याचेही आर्थिक गणित चुकले. राज्यासह रायगडात कोरोना प्रादुर्भाव हा आटोक्यात येऊ लागला आहे. त्यामुळे रायगडातील ऐतिहासिक स्थळे, स्मारके पर्यटनास पर्यटकांना खुली करण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून पर्यटकांनी पर्यटन करावे असेही आदेशात म्हटले आहे.

रायगड हा पर्यटन जिल्हा असल्याने लाखो पर्यटक हे मुरुड जंजिरा, किल्ले रायगड, कुलाबा किल्ला तसेच इतर ऐतिहासिक स्थळे, स्मारक यांना भेटी देतात. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला फटका बसला होता. पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकही अडचणीत आले होते. मात्र आता पुन्हा जिल्ह्यातील गड, किल्ले हे पर्यटकांनी बहरणार आहेत. मुरुड जंजिरा किल्ला, रायगड किल्ला, कुलाबा किल्ला हे किल्ले पर्यटकांची आवडती पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे ऐतिहासिक पर्यटन सुरू झाल्याने पुन्हा आता गड, किल्ले यावर पर्यटक जाऊन  इतिहासाच्या आठवणी जागवणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT