Lightning Kills saam tv
महाराष्ट्र

Shocking News: शेतात पेरणीची तयारी करण्यासाठी गेली, पण तिथेच काळानं गाठलं, महिलेचा दुर्दैवी मृत्यू, काय घडलं?

Hingoli News: संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे, यातच आता हिंगोलीमध्ये एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

Omkar Sonawane

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पारडी पोहकर परिसरात शेतकरी महिलेवर वीज कोसळली आहे या घटनेत शेतकरी महिला जागीच ठार झाली आहे. मुक्ता गिरी असे या वीज कोसळून ठार झालेल्या महिलेचे नाव असून शेतशिवारात खरिपाच्या पेरणीची तयारी करण्यासाठी ही महिला गेली होती.

यावेळी अचानक वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये वीज पडून या महिलेच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे शेतकरी महिलेच्या गावासह परिसरात शोकळा पसरली असून या महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सेनगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सोनगाव तालुक्यातील पारडी पोहकर परिसरात शेतकरी महिलेवर वीज पडून मुक्ता गीरी या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सेनगावात शोककळा पसरली आहे.

सध्या संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सेनगावमध्ये अधून मधून पाऊस चालू असून आज विजेचा कडकडाट अधिक पप्रमाणात होता. काही भागात मेघगर्जना ही होत होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे मुक्ता गिरी ही महिला आज दुपारी शेतशिवारात खरीपाच्या पेरणीसाठी शेतात गेली यावेळी अचानक वादळी वारे व पावसाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये वीज पडून यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृतदेह सेनगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

SCROLL FOR NEXT