Hingoli Accident Saam Tv News
महाराष्ट्र

Accident News: उभ्या डंपरला कारची धडक; २ जण जागीच ठार, ६ जण जखमी, २ वर्षांच्या चिमुकल्यानेही सोडले प्राण

Hingoli Vasmat Accident: वसमत तालुक्यातील टोकाई ते कोठारी रस्त्यावर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

Bhagyashree Kamble

हिंगोलीतून एक भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. वसमत तालुक्यातील टोकाई ते कोठारी रस्त्यावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, टोकाई पाटीजवळ रस्त्यावर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या डंपरला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच मृतांमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर रिफ्लेक्टर किंवा रेडियमशिवाय उभ्या असलेल्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अनेक वाहनधारकांनी प्रशासनाकडे यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

Maharashtra News Live Update: धुळे मनपा आयुक्तांचा आक्रमक पवित्रा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन

Summer AC Settings: उन्हाळ्यात AC कितीवर ठेवला पाहिजे? लाईटबिल होईल अर्ध

SCROLL FOR NEXT