Hingoli tractor accident 8 people died Saam Tv News
महाराष्ट्र

Hingoli Accident : हिंगोली अपघातात दोन सख्ख्या जावांचा करुण अंत, दोन लेकरं पोरकी; ट्रॅक्टर दुर्घटनेनं अख्खं गाव हळहळलं

Hingoli Tractor Accident : हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावालगतच्या वस्तीमध्ये शेतमजूर राहत होते. नेहमीप्रमाणे हे नागरिक शेतमजुरीचे काम करत असत आज सकाळी शेतातील कामानिमित्त ट्रॅक्टरमध्ये बसून हे मजूर जात होते.

Prashant Patil

हिंगोली : हिंगोलीमध्ये शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघात ८ जणांचा करुण अंत झाला. हिंगोली-नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला. अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, ८ जणांचे या भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण गावासह अख्खा महाराष्ट्र देखील सुन्न झाला आहे.

या अपघातात एकाच गावातील ७ महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावालगतच्या वस्तीवरील एकाच कुटुंबातील दोन सुना पार्वती आणि सरस्वती या दोन सुनांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनं गावावर आणि कुटुंबावर शोककळा पसरली असून लहान मुले आईच्या प्रेमाला पोरकी झाली आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावालगतच्या वस्तीमध्ये शेतमजूर राहत होते. नेहमीप्रमाणे हे नागरिक शेतमजुरीचे काम करत असत आज सकाळी शेतातील कामानिमित्त ट्रॅक्टरमध्ये बसून हे मजूर जात होते. दरम्यान, गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये हे ट्रॅक्टर पडल्याने कामगार महिलांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. विहिरीतून एकूण ७ मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले असून तीन जणांना वाचवण्यात स्थानिक आणि प्रशासनाला यश आलं आहे.

या घटनेनं गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून एकाच गावातील ७ महिलांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याने गावात स्मशान शांतता पसरली आहे. विशेष म्हणजे गावातील एका कुटुंबातील दोन सुना म्हणजेच सख्ख्या जावांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दोन्ही महिलांना २ आणि ५ वर्षांची लहान-लहान मुलं आहेत. त्यामुळे, कोवळ्या वयातच काळाने मोठा सूड या चिमुकल्यांवर उगवल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, या ५ लाख रुपयांच्या मदतीने या कटुंबातील चिमुकल्यांचं आयुष्य तडीस जाईल का? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीत क्रिकेट मैदानासाठी भाजप-शिवसेना शिंदे गट आक्रमक; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Health care: ना वजन वाढेल, ना पोट सुटेल, जेवणानंतर फक्त ५ मिनिटं करा हा सोपा व्यायाम

Interesting Facts : ट्रकच्या मागे 'हॉर्न ओके प्लिज' का लिहिलं जातं? ९९ टक्के माहीत नाही

Maharashtra News Live Update: वर्ध्यात गोरस भंडारावर एफडीएची कारवाई; २५.८६ लाखांचा दुग्धजन्य साठा जप्त

शिंदेसेनेच्या नगरसेवकाचे पद रद्द होणार? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष, राजकीय हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT