School Bus Accident Saam TV
महाराष्ट्र

School Bus Accident: विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला मोठा अपघात; ७ ते ८ विद्यार्थी गंभीर जखमी

Accident News: अपघात झालेली व्हॅन युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलची असल्याचं समजलं आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

Hingoli Accident News: हिंगोलीतून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. एका शाळकरी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये ७ ते ८ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हिंगोलीच्या वसमतमध्ये खाजगी शाळेच्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सात ते आठ चिमुकले गंभीर जखमी झालेत. अपघात झालेली व्हॅन युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलची असल्याचं समजलं आहे.

सकाळी विद्यार्थ्यांना घरून शाळेत घेऊन येताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेलेल्या या बसचा चालक मध्येच बदलण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही माहिती दिली असून ड्रायव्हर बदलल्यानेच अपघात झाल्याचा आरोप आता पालकांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठी गर्दी केली होती.

रस्त्यावर खड्ड्यामुळे वाहने उलटली

परभणीच्या सोनपेठ शहरातील प्रमुख मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. याच खड्ड्यांमुळे एक रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. या घटनेमध्ये ऑटोचालक गंभीरित्या जखमी झाला असून प्रशासनाने रस्ते दुरुस्तीकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे. या अगोदर देखील या रस्त्यावर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. परंतु प्रशासन या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आयुष्यात या ४ गोष्टी समजून घ्या, नाही तर तुमचं जगणं व्यर्थ, वाचा चाणक्यांची नीती

PM मोदींच्या रॅलीआधी मोठा राडा; टीएमसी-भाजपचे कार्यकर्ते भिडले, वाहनांवर दगडफेक

Kalyan Crime : 'मी माझ्या बायकोला मारून आलो'; हैवान नवऱ्यानं ९ वर्षांच्या मुलासमोरच बायकोचा जीव घेतला

Maharashtra Live News Update : पालकमंत्री प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा वरिष्ठांवर विश्वास

घरच्या घरी कसा बनवाल खुसखुशीत मालपुआ, पाहा अगदी सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT