Hingoli News Today, Hingoli Earthquake Today, Latest Marathi News  Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli : हिंगोलीत २० गावांना भूकंपाचे धक्के; भरपावसात नागरिक रस्त्यावर

भरपावसात वसमत तालुक्यातील गावांना हादरे बसल्याची माहिती आहे.

संदीप नांगरे

हिंगोली : सध्या राज्यात मुसळधार पावसाने (Rain) थैमान घातलं असतानाच हिंगोलीतून (Hingoli) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील तब्बल 20 गावांना अचानक भूकंपाचे हादरे बसले असल्याची माहिती आहे. या खळबळजनक घटनेनं ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Hingoli News Today)

वसमत तालुक्यातील वापटी कुपटी शिरळी कुरुंदा पांगरा, राजवाडी आमदरी या गावासह परिसरातील 20 गावांना आज सकाळ पासून दोन वेळा हादरे बसल्याने नागरिक घराच्या बाहेर बसले आहेत. आमच्या गावात बसलेले हादरे हे भूकंपाचे असल्याची माहिती नागरिक देत आहेत. मात्र हे हादरे भूकंपाचे आहेत की, नाही या बाबत अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

गावकऱ्यांना बसलेल्या हादऱ्यांबाबत लातूर येथील भूमापक केंद्राला सांगण्यात आले असून, त्यांच्या अहवालानंतरच या हादऱ्याचं कारण स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. (Hingoli Earthquake Today)

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT