Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : एसआरपीएफमध्ये भरती होण्याचे स्वप्न भंगले; रेल्वेत चढताना झाला घात

Hingoli Malshelu Railway Station : हिंगोली- वाशिम रेल्वे मार्गावर रेल्वेच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हिंगोलीच्या माळशेलू रेल्वे स्थानकावर ही घटना घडली रेल्वे पोलीस तपास करत आहेत

संदीप नागरे

हिंगोली : एसआरपीएफमध्ये भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असल्याने त्यासाठी परीक्षा देण्यासाठी गेला. परीक्षा देऊन घरी परतत असताना होत्याचे नव्हते झाले. रेल्वे प्लॅटफॉर्मवरून रेल्वेमध्ये चढत असताना पाय निसटला. यामुळे रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील माळशेलू रेल्वे स्थानकावर घडली आहे. हे भयानक दृश्य पाहून अन्य प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला होता. 

हिंगोली- वाशिम रेल्वे मार्गावर रेल्वेच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हिंगोलीच्या माळशेलू रेल्वे स्थानकावर ही घटना घडली असून यात सोमनाथ गजानन रणवर असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात मृत झालेला तरुण हा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलीस तपास करत आहेत. 

पॅसेंजर थांबल्याने उतरला खाली 

दरम्यान सोमनाथ रणवर याला एसआरपीएफमध्ये भरती व्हायचे होते. यासाठी त्याने अर्ज देखील भरला होता. त्यानुसार सोमनाथ एसआरपीएफच्या परीक्षेसाठी हैदराबाद येथे गेला होता. परीक्षा देऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या सोमनाथने पूर्ण पॅसेंजरने प्रवास सुरू केला. दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील माळसेलू रेल्वे स्थानकावर पॅसेंजर थांबली असता सोमनाथ लघुशंकेसाठी खाली उतरला होता. 

रेल्वेत चढताना पाय घसरला  

सोमनाथ लघुशंकेसाठी जात असतानाच अचानक गाडी सुरू झाली. त्यामुळे गाडी सुटेल यातून तो गाडी पकडायला धावणाऱ्या सोमनाथचा पाय घसरला. पाय घसरल्याने सोमनाथ थेट पॅसेंजर रेल्वे खाली पडला आणि यात तो चिरडला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने मृत तरुणाचा मृतदेह बाजूला करत रेल्वे सेवा सुरळीत केली आहे. दरम्यान घटनेची माहिती सोमनाथच्या कुटुंबियांना देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT