Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : धक्कादायक! क्लासमधील शिक्षकांच्या त्रासाला वैतागला, विद्यार्थ्याने घेतली रेल्वेखाली उडी

Hingoli News : मुलाचे बारावीचे वर्ष असल्याने आई- वडिलांनी त्याचा खासगी क्लास लावलेला होता. कॉलेज संपल्यानंतर किरण क्लास ला जायचा

संदीप नागरे

हिंगोली : शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी आणि तितकीच धक्कादायक घटना हिंगोलीत घडली आहे. हिंगोली शहरात खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीसाठी आलेल्या एका सोळा वर्षे विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्लास मधील तीन शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 

हिंगोली (Hingoli) शहरात हि धक्कादायक घटना घडली आहे. किरण गजानन लोंढे (वय १६) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. मुलाचे बारावीचे वर्ष असल्याने आई- वडिलांनी त्याचा खासगी क्लास लावलेला होता. कॉलेज संपल्यानंतर किरण क्लासला जायचा. दरम्यान या क्लासमधील शिक्षकांकडून किरणला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून किरणने रेल्वे समोर उडी मारत आत्महत्या केली आहे. 

आत्महत्या करण्यापूर्वी कुटुंबाला केला फोन 

किरणने रात्री उशिरा कुटुंबीयांना फोन करत आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. या नंतर घाबरलेल्या नातेवाईकांनी याची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलीस शोध घेण्याआधीच किरणचा मृतदेह हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या रेल्वे रुळावर सापडला. 

सुसाईड नोट सापडल्याने खळबळ 

दकिरणने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईट नोट लिहून ठेवली असून त्यामध्ये कोचिंग क्लासेस मधील एक शिक्षक क्लासमधील मुलीसोबत शारीरिक सबंध ठेवत असून अनेक मुलींशी त्याने संबंध ठेवले आहेत. त्यात इतर दोन शिक्षकांचा देखील सहभाग असून त्यांना शिक्षा द्या. त्यांच्यामुळेच आपण आत्महत्या करतोय असे लिहिले आहे.  या घटने नंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तरुणाच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Update: ओबीसी बांधव जात पडताळणी कार्यालयात; बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका

जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढळले मृतदेह अन्...

SCROLL FOR NEXT