Hingoli Accident Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Accident : सुसाट रिक्षातून ३ विद्यार्थिनी पडल्या; एकीचा जीव गेला, नेमकं काय घडलं?

Hingoli News : हिंगोली- सेनगाव या राज्य महामार्गावर असलेल्या राहुली फाट्याजवळ रिक्षा येताच एक विद्यार्थिनी अचानक रोडवर कोसळली. तर पाठोपाठ दुसऱ्या दोन विद्यार्थिनी देखील कोसळल्या

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली ते सेनगाव राज्य महामार्गावर अपघाताची भयंकर घटना समोर आली आहे. यात सुसाट वेगाने जाणाऱ्या रिक्षामधून तीन विद्यार्थिनी अचानक खाली कोसळल्या. यामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी विद्यार्थीनींना लागलीच उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हिंगोलीत सुसाट धावणाऱ्या ऑटो रिक्षामधून तीन विद्यार्थिनी कोसळल्याची घटना घडली आहे. हिंगोलीच्या बसस्थानकाकडून जांभरून या गावाकडे जाण्यासाठी या १७ वर्षाच्या तिन्ही मुली एका ऑटो रिक्षामधून प्रवास करण्यासाठी बसल्या होत्या. दरम्यान हिंगोली- सेनगाव या राज्य महामार्गावर असलेल्या राहुली फाट्याजवळ रिक्षा येताच एक विद्यार्थिनी अचानक रोडवर कोसळली. तर पाठोपाठ दुसऱ्या दोन विद्यार्थिनी देखील कोसळल्या. 

रिक्षा चालकाला कुठलीही इजा नाही  

रिक्षाचा वेग अधिक असल्याने रस्त्यावर कोसळलेल्या मुलींमधील एकीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान या रिक्षामध्ये केवळ या तीनच मुली प्रवास करत असल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे या अपघातात ऑटो रिक्षासह रिक्षा चालकाला कुठलीही इजा झालेली नसून केवळ या तिन्ही मुली धावत्या रिक्षातून पडल्या कशा? त्यामुळे पोलिसांना संशय आहे. 

रिक्षा चालकाला घेतले ताब्यात 

दरम्यान अपघाताबाबत पोलिसांना संशय बळवल्याने पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघाताबाबत चौकशी सुरु आहे. दरम्यान अपघाताची घटना घडल्यानंतर ऑटो चालकाने स्वतः या मुलींना घटनास्थळावरून उचलून नेत रुग्णालयात दाखल केल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. परंतु नेमका हा अपघात घडला कसा? याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसला आग

Navi Mumbai Airport: मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास फक्त ५ मिनिटांत, काय आहे सरकारचा मास्टरप्लान?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा, कोणाचे कर्ज होणार माफ?

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' मराठीनंतर हिंदीतही १ नंबरवर! रितेश भाऊंनी रचला इतिहास, कमावले तब्बल 'इतके' कोटी

Salman Khan: 'माझं नाव खराब होतंय...'; 'काला हिरण' चित्रपटावरून सलमान खान भडकला, थेट कोर्टात ठोकली धाव!

SCROLL FOR NEXT