Rohit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar News : लाडकी बहीण योजना बंद नव्हे सुरूच ठेवणार; आमदार रोहित पवार यांच्याकडून योजनेचे कौतुक

Hingoli News : हिंगोलीच्या वसमत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आमदार रोहित पवार बोलत होते

संदीप नागरे

हिंगोली : महायुती सरकारची लाडकी बहीण योजना महाराष्ट्रासह देशभरात गाजत आहे. या योजनेमधून प्रत्येक महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत असल्याने ही योजना लोकप्रिय झाली आहे. सुरुवातीला विरोधकांनी या योजनेवरून सरकार विरोधात टीका केली होती. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी आता लाडकी बहीण योजनेचे कौतुक केल आहे. 

हिंगोलीच्या वसमत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आमदार रोहित पवार बोलत होते. राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून महायुती सरकारवर निशाणा साधत आहेत. मात्र राज्यात महिलांचा या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून आता विरोधक देखील सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या प्रेमात पडले आहेत. रोहित पवार यांनी योजनेचे कौतुक करताना योजना बंद न पडण्याचे यावेळी स्पष्ट केले. 

सरकार आले तरी योजना सुरूच राहणार 

युती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना हि चांगली योजना असून निवडणुकीनंतर राज्यात सत्ता बदल झाली. अर्थात आमचे महाविकास आघाडीचे सरकार आले तर योजना बंद पडणार नाही तर ती आम्ही सुरूच ठेवू; असं विधान लाडकी बहीण योजनेवरून रोहित पवार यांनी केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डीला जात असलेल्या तेलंगणा राज्यातील भाविकांना हत्यारांचा धाक दाखवत लुटले

Aadhaar New Rule: 'आधार कार्ड'वर सरकार आणखी मोठा निर्णय घेणार, फोटोकॉपी देण्यावर नियम येणार

अक्षय खन्नाची 'धुरंधर' एन्ट्री, Hook step वर सगळेच फिदा; व्हायरल गाणं नेमकं कुठलं?

Kolhapur News: कोल्हापुरात कृषी प्रदर्शनात गोंधळ; दोन तरुणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी|VIDEO

Indigestion problems: थंडीच्या दिवसात होतेय अपचनाची समस्या? स्वयंपाक घरात असलेला हा मसाला करेल त्रास दूर

SCROLL FOR NEXT