Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Poshan Aahar : पोषण आहारातील तांदूळ काळ्या बाजारात विक्री; विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले

Hingoli News : हिंगोलीच्या पांगरी गावात जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकाचा हा प्रताप विद्यार्थ्यांनी उघडकीस आणला आहे

संदीप नागरे

हिंगोली : शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविली जात असते. या योजनेंतर्गत शाळांमध्ये पुरवठा केल्या जाणाऱ्या धान्याचा कला बाजार नेहमीच समोर आला आहे. यात हिंगोली जिल्ह्यात पोषण आहाराची खिचडीसाठी आणलेले तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या मुख्याध्यापकाला विद्यार्थ्यांनी रंगेहाथ पकडले. 


हिंगोलीच्या (Hingoli) पांगरी गावात जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकाचा हा प्रताप विद्यार्थ्यांनी उघडकीस आणला आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाकडून पोषण आहारासाठी धान्याचा पुरवठा केला जात असतो. शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराची (Poshan Aahar) खिचडी शिजवण्यासाठी दिलेला तांदूळ मुख्याध्यापक चक्क काळ्या बाजारात विक्री करत असल्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील पांगरी गावात उघड झाला आहे. 

ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा 

शाळेच्याच विद्यार्थ्यांनी हा प्रकार समोर आणल्याने मुख्याध्यापकाला ग्रामस्थांसमोर आणले. यामुळे या प्रकाराची मुख्याध्यापकाने ग्रामस्थांपुढे कबुली देखील दिली आहे. तसेच शिक्षण विभागाला देखील याबाबत माहिती देण्यात आली असून या घटनेनंतर शिक्षण विभागाने अद्याप कार्यवाही सुरू केली नसल्याने ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT