Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : प्रेम प्रकरणातून मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाची हत्या; चार महिन्‍यानंतर गुन्‍हा दाखल

प्रेम प्रकरणातून मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाची हत्या; चार महिन्‍यानंतर गुन्‍हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

हिंगोली : प्रेम प्रकरणातून तरुणीला विवाह करण्यासाठी पळून घेऊन जाणाऱ्या तरुणाची मुलीच्या नातेवाईकांनी विष पाजून (Crime News) हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर (Hingoli) चार महिन्‍यानंतर आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (Breaking Marathi News)

हिंगोलीच्या रेल्वे स्टेशन परिसरात चार महिन्यांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी (Police) तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला होता. मात्र मृत मुलाच्या वडिलांनी त्यांचा मुलगा मिलिंद सुर्वे यांची हत्या झाल्याचा आरोप करत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात मुलीचे नातेवाईक असलेल्या आठ जणांविरुद्ध खुनाचा पुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

अटकेची कारवाई सुरू

न्‍यायालयाच्‍या (Court) आदेशानंतर हिंगोलीच्या शहर पोलीस स्थानकात वाशिम जिल्ह्यातील मालेगावच्या खंडाळा गावातील मुलीचे नातेवाईक असलेल्या आठ आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी खुणाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

How To Increase Stamina : शरीराची ताकद वाढविण्यासाठी काय खावे?

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT