Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : प्रेम प्रकरणातून तरुणी पोहचली थेट प्रियकराच्या घरी; मुलाच्या घराच्यांची झाली पंचायत, तरुणी विरोधात गुन्हा दाखल

Hingoli News : हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोळेगाव या गावात हा प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणीने प्रियकर तरुणाचे घर गाठले. सरळ घरात घुसून या तरुणीने घराचा ताबा घेतला आहे

संदीप नागरे

हिंगोली : प्रेम प्रकरणातून तरुणीला त्रास दिला जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोळेगावमध्ये अजब प्रकार समोर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. प्रेम प्रकरणातून तरुणीने थेट घर गाठत घरचाच ताबा घेतला. या प्रकरणी पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. 

हिंगोलीच्या (hingoli) औंढा तालुक्यातील गोळेगाव या गावात हा प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणीने प्रियकर तरुणाचे घर गाठले. सरळ घरात घुसून या तरुणीने घराचा ताबा घेतला आहे. इतकेच नाही तर मुलाच्या आई- वडिलांना तुमच्या मुलावर माझं प्रेम आहे. त्यामुळे तुमच्या घरातून मी बाहेर जाणारच नाही; असे म्हणत तब्बल ४८ तास ही तरुणी घरात ठाण मांडून बसली होती. या प्रकारामुळे तरुणाच्या कुटुंबीयांच चांगलीच पंचायत झाली आहे.  

तरुणी विरोधात गुन्हा दाखल 

दरम्यान सदर तरुणी घरातून जात नसल्याच्या प्रकारानंतर तरुणाचे वडील प्रकाश थिटे यांनी औंढा पोलीस (Police) स्थानकात जात घराचा ताबा घेणाऱ्या तरुणीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांचे निलंबन

सोयाबीनच्या बाजारात भ्रष्टाचाराचे दलाल, मंत्र्याच्या OSDच्या नावानं लाखोंची मागणी

अपात्र लाडकींनी लुटले 165 कोटी, 12 हजार पुरुषांचाही सरकारी तिजोरीवर डल्ला

भाजप नेत्याच्या मुलीचा भरदिवसा विनयभंग; दुचाकीस्वाराने कानशि‍लात लगावली, घटना CCTVत कैद

डिझेल टँकर पेटला; आगीच्या ज्वाळा अन् धुराचे काळेकुट्ट लोट रस्त्यावर पसरत गेले...VIDEO

SCROLL FOR NEXT