Gas Cylinder Blast Saam tv
महाराष्ट्र

Gas Cylinder Blast : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, सहा दुकानांचे मोठे नुकसान

HIngoli News : स्फोटामुळे आगीचा भडका उडाला असून आजूबाजूच्या सहा दुकानांना आग लागली. आग लागताच नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीच्या वसमतमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. वसमत शहराच्या जवळ (Hingoli) असलेल्या खांडेगाव पाटी जवळ गॅरेजमध्ये ठेवण्यात आलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. (Live Marathi News)

हिंगोली शहरालगत असलेल्या वसमटमध्ये हा प्रकार घडला आहे. सिलेंडरचा (Gas Cylinder) स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला. सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घाबरत निर्माण होऊन धावपळ सुरु झाली. या स्फोटामुळे (Fire) आगीचा भडका उडाला असून आजूबाजूच्या सहा दुकानांना आग लागली. आग लागताच नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या बाबत अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली होती. आग विझवण्यासाठी वसमत पालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तब्बल दोन तासानंतर ही आग विझवण्यात पालिकेच्या आग्निशमन पथकाला यश आले आहे. 

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जीवितहानी टळली  

सिलेंडरचा स्फोट होऊन लाल्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र सिलेंडरच्या स्फोटाने परिसरातील पाच दुकानांना आग लागून दुकानातील धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान किती रुपयांचे झाले याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT