Hingoli Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Water Shortage : नागरिकांकडून दररोज दीडशे टँकरद्वारे पाण्याची खरेदी; हिंगोली शहरातील भीषण चित्र

Hingoli News : प्रशासन नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात कमी पडल्याने शहरातील नागरिक दररोज दीडशे टँकर पाणी खरेदी करत आहे,

संदीप नागरे

हिंगोली : पाणी टंचाईच्या झळा सगळीकडे जाणवत आहेत. ग्रामीण भागासह आता शहरी भागात देखील पाण्याची समस्या जाणवत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. त्यानुसार हिंगोली शहरात देखील पाण्याची समस्या असल्याने शहरातील नागरिकांकडून तब्बल दीडशे टँकरद्वारे पाणी खरेदी केले जात आहे. 

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहराला देखील पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. प्रशासन नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात कमी पडल्याने शहरातील नागरिक दररोज दीडशे टँकर पाणी खरेदी करत आहे, दैनंदिन वापरासासह पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी हिंगोलीकरांना प्रति टँकर सातशे रुपये मोजावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. तरी देखील हे पाणी पुरेसे होत नाही. 

पाऊस लांबला तर चित्र बिकट 

मी महिन्यात हे चित्र अधिक विदारक झाले असून सगळ्यांना आता (Rain) पावसाची प्रतीक्षा लागून आहे. दरम्यान पाऊस लवकर पडला नाही; तर पिण्याच्या (Water Scarcity) पाण्याची ही स्थिती आणखी गंभीर होणार असल्याची शक्यता देखील नागरिकांनी वर्तवली आहे. तो पर्यंत नागरिकांना पाणी विकत घेऊनच वापरावे लागणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT