Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : मोठी दुर्घटना टळली! ब्रेक फेल होऊन एसटी बस थेट घराला धडकली; ६५ विद्यार्थिनींचा चालकाने वाचवला जीव

Hingoli news : हिंगोलीत मानव विकास अंतर्गत चालणाऱ्या महामंडळाच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात घडला आहे

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीत बसचा मोठा अपघात टळला आहे. ६५ विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या धावत्या बसचे ब्रेक फेल झाले. यामुळे बस रस्त्यावरून कोठेही जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र बस चालकाच्या सतर्कतेने हा अपघात टाळला असून एसटी बस थेट घराला जाऊन धडकली, दरम्यान बसमधील सर्व विद्यार्थिनी सुखरूप आहेत. 

हिंगोलीत (Hingoli) मानव विकास अंतर्गत चालणाऱ्या महामंडळाच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात घडला आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वटकळी गावातून प्रवास करताना ही घटना घडली आहे. मात्र बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या ६५ विद्यार्थिनींचे प्राण वाचले आहे. मात्र (Bus Accident) अपघातानंतर बसमधील सर्व विद्यर्थिनी प्रचंड घाबरल्या होत्या.  

चालकाने बस चालवत असताना बसचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच एसटीच्या चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणली. अपघाता दरम्यान या बस एका घराला धडक दिली. यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले. मात्र बस मधील विद्यार्थ्यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. तसेच ज्या घरातला धडक दिली त्याठिकाणी देखील कोणीच नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT