Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: ड्युटी आटोपून जाताना अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

ड्युटी आटोपून जाताना अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांचे अपघाती (Accident) निधन झाले आहे. सुरेश बांगर असे निधन झालेल्या या कर्मचाऱ्यांचे नाव असून (Hingoli) हिंगोली कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. (Breaking Marathi News)

हिंगोली जिल्‍ह्यातील वरिष्‍ठ पोलिस कर्मचारी असलेले सुरेश बांगर हे नेहमीप्रमाणे सेवेत हजर होते. दुपारी त्‍यांची ड्युटी संपल्‍याने त्‍यांनी वरिष्‍ठांची भेट घेवून घरी जाण्यासाठी निघाले होते. पोलीस कर्मचारी बांगर हे कर्तव्य बजावून जात असताना हिंगोली– कळमनुरी महामार्गावर त्‍यांच्‍या दुचाकीला चार चाकिने जोरदार धडक दिली. या धडकेत बांगर हे दुचाकीवरून रस्‍त्‍यावर फेकले गेले. यात त्‍यांच्‍या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्‍याने त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला.

परिवाराचा आक्रोश

पोलिस (Police) कर्मचारी सुरेश बांगर हे आपली ड्युटी आटोपून जाताना सर्वांची भेट घेवून निघाले. मात्र काही वेळानंतर त्‍यांच्‍या अपघाताची बातमी पोलिस स्‍टेशनला आली. तसेच बांगर यांच्‍या मृत्‍यूबाबत परिवाराला माहिती झाल्‍यानंतर परिवारातील सदस्‍य रूग्‍णालयात पोहचले. बांगर यांचा मृतदेह पाहून परिवाराने आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green vs Red Apple : लाल की हिरवं? रोज कोणतं सफरचंद खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदार संघात मोठी राजकीय घडामोड

बीडमध्ये एसटी बस अन् कारची भीषण धडक; पाच जणांचा मृत्यू, परिसरात हळहळ

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! फिटमेंट फॅक्टर 4 झाला तर पगार किती वाढणार? आत्ताच जाणून घ्या गणित

हार्ट अटॅकपासून ते बीपीपर्यंत... सकाळी १ पाकळी लसूण खा आणि 'या' आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT