Aundha Nagnath Temple Saam tv
महाराष्ट्र

Aundha Nagnath Temple : शिवालयात १० वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; खेळत असताना लोखंडी गेट पडलं अंगावर

शिवालयात १० वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; खेळत असतांना लोखंडी गेट पडले अंगावर

साम टिव्ही ब्युरो

हिंगोली : देशातील बारा पैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिर परिसरात दुर्दैवी घटना (Hingoli) घडली आहे, नागनाथ मंदिर संस्थानच्या गलथान कारभारामुळे लोखंडी प्रवेशद्वार अंगावर पडून एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे आठ वाजता मंदिर परिसरात घडली आहे. (Latest Marathi News)

हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथील नागनाथ मंदिराच्या पाठीमागील भागात हे लोखंडी प्रवेशद्वार लावण्यात आले होते. याच ठिकाणी दररोज अनेक चिमुकले खेळण्यासाठी जातात. यात सोमनाथ पवार हा देखील नेहमीप्रमाणे इतर सहकाऱ्यांसोबत खेळण्यासाठी आला होता. याच वेळी अचानक हे लोखंडी प्रवेशद्वार त्याच्या अंगावर पडले. परिसरातील नागरिकांनी तातडीने सोमनाथकडे धाव घेऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी सोमनाथचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. 

मंदिर संस्थानचे दुर्लक्ष

सादर घटनेनंतर देशातील महत्त्वपूर्ण असलेल्या औंढा नागनाथ मंदिर संस्थानाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत सोमनाथच्या अंगावर पडलेले हे लोखंडी द्वार गेल्या अनेक वर्षांपासून लावण्यात आले होते. मात्र दुरुस्ती विना हे प्रवेशद्वार खिळखिळ झाले होते. याकडे मंदिर संस्थानने दुर्लक्ष केल्याने सोमनाथचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेची औंढा पोलिसांनी नोंद केली असून, अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT