Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli : बाजारपेठेत विक्री करण्याआधीच शेतमाल चोरीला; लाखो रुपयांच्या हळदीची चोरी

Hingoli News : वर्षभर काबाडकष्ट कष्ट करत शेतात हळदीचे उत्पादन घेतले होते. चांगले उत्पादन झालेली हळद काढणी करून ठेवली होती. सकाळी हि हळद मार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्याचे नियोजन तिडके यांचे होते

संदीप नागरे

हिंगोली : मोठ्या कष्टाने पिकविलेले हळद काढणी करून ठेवली. सकाळी हि हळद विक्रीसाठी नेणार होते. मात्र या पूर्वीच शेतात काढून ठेवलेली लाखो रुपयांची हळद चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील खुदनापूर शिवारात एक लाख 40 हजार रुपयांची हळद चोरट्यांनी लंपास केली आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतामधून शेतमाल चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. दत्तराव शेषराव तिडके असे हळद चोरीला गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव असून तिडके यांनी वर्षभर काबाडकष्ट कष्ट करत शेतात हळदीचे उत्पादन घेतले होते. चांगले उत्पादन झालेली हळद काढणी करून ठेवली होती. सकाळी हि हळद मार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्याचे नियोजन तिडके यांचे होते. 

दहा क्विंटल हळद चोरी 

दरम्यान बाजारपेठेत विक्री करण्यासाठी तिडके कुटुंबीयांनी शिजवून सुकायला ठेवली होती. मात्र पावसाचे वातावरण असल्याने ही हळद पुन्हा पोत्यात भरून ठेवली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तिडके यांच्या दहा क्विंटल हळदीवर डल्ला मारत एक लाख ४० हजारांची हळद लंपास केली आहे. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घ्यावा; अशी मागणी शेतकरी तिडके यांनी केली आहे.  

आता कर्जफेडीची चिंता 

दत्तात्रय तिडके यांच्या मुलीचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज काढले होते. घेतलेलं कर्ज हळदीच्या उत्पादनातून फेडायचं होतं. मात्र त्याआधीच चोरट्यांनी हळद चोरी केल्याने आता काय करावे; कर्जाची फेड कशी करायची; अशी उदिग्ण भावना हळद चोरीला गेलेल्या शेतकऱ्यांने व्यक्त केली आहे. अर्थात दहा क्विंटल हळद चोरीला गेल्याने आर्थिक समस्या शेतकर्यांसमोर उभी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT