santosh bangar  saam tv
महाराष्ट्र

Santosh Bangar News: शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका; पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर आमदार बांगर भडकले

Santosh Bangar News: आमदार संतोष बांगर यांनी फोन करून एका पीकविमा कंपनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केल्यामुळे चर्चेत आले आहेत.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

Santosh Bangar Latest News:

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर त्यांच्या वादग्रस्त विधान आणि आक्रमक स्वभावामुळे नेहमी चर्चेत असतात. गेल्यावर्षी बांगर यांनी एका उपगारगृहातील कर्मचाऱ्यालाही मारहाण केली होती. तर संतोष बांगर यांनी काही महिन्यांपूर्वी वृद्ध प्राचार्याला मारहाण केली होती. त्यानंतर आता आमदार संतोष बांगर यांनी फोन करून एका पीकविमा कंपनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केल्यामुळे चर्चेत आले आहेत. (Latest Marathi News)

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊन देखील पिकविमा कंपनीचे कर्मचारी योग्यरीत्या पंचनामे करत नसल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे केली होती.

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आमदार संतोष बांगर यांनी थेट पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला. संतोष बांगर यांनी पिकविमा अधिकाऱ्यांना फोन करत म्हटलं की, 'तुम्हाला पीकविमा कंपनीला मोठं करायचे आहे का, तुम्हाला माज चढला आहे का, शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका. अळ्या पडतील, असे म्हणत समज दिली'.

तत्पूर्वी, आमदार संतोष बांगर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यापूर्वी देखील सत्तेत असताना कृषी अधिकारी आणि पीकविमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप बांगर यांनी केला होता. तसेच संतोष बांगर यांनी पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करत आंदोलन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

CJP Protest: सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला

SCROLL FOR NEXT